लातूर बाजार समिती चे नवनिर्वाचित सभापति उपसभापती यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख आमदार धीरज देशमुख यांची भेट घेवून आभार व्यक्त केले
लातूर (जिल्हा प्रतिनिधी):-लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कृषि विकास पॅनल च्या सर्वच्या सर्व १८ जागा निवडून आल्या होत्या त्यानुसार मंगळवारी बाजार समिती मध्ये सभापती व उपसभापती पदासाठी बिनविरोध निवडणुक झाली त्यात सभापतीपदी जगदीश बावणे (तांदुळजा) तर उपसभापती सुनिल पडीले (बोरी) यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित सभापति उपसभापती सन्माननीय संचालक मंडळाने लातूर येथील आशियाना बंगल्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब आमदार धीरज देशमुख यांच्या भेटी घेवून त्यांचे आभार व्यक्त केले सत्कार केला
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे विलास बँकेचे उपाध्यक्ष अँड समद पटेल विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूलगे,दगडु पडीले, सचिन दाताळ, बाजार समितीचे सर्व नवनिर्वाचित संचालक आनंद पाटील तुकाराम गोडसे, युवराज जाधव, लक्ष्मण पाटील, श्रीनिवास शेळके,लतिका देशमुख सुरेखा पाटील, अनिल पाटील शिवाजी देशमुख ,सुभाष घोडके, बालाजी वाघमारे, सचिन सूर्यवंशी बालासाहेब बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते