शहरातील धोकादायक गतिरोधक तातडीने हटविले
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांचा सत्कार
निलंगा ( प्रतिनिधी) शहरातील अनेक ठिकाणी अदृश्य गतिरोधक अपघातचे केंद्र बिंदू बनले होते.ज्यामुळे ये जा करणाऱ्या दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवरून धक्का लागून पडत होते.परिणामी अपघाताचे प्रमाण निलंगा शहरात वाढत चालले असल्याने तातडीने सामाजिक कार्यकर्ते प्रा. दयानंद चोपणे यांनी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी गणेश क्षीरसागर यांना निवेदनद्वारे अदृश्य शहरांतील धोकादायक गतिरोधक तात्काळ हवटवून नवीन रेडीयम सह गतिरोधक नामफलक लावावे अशी मागणी करताच अनेक वर्तमानपत्रात सदरील अदृश्य गतिरोधक ची बातमी प्रकाशित होताच बांधकाम विभाग खळबळून जागे होत निलंगा शहरांतील सगळेच अदृश्य गतिरोधक हटवून नवीन गतिरोधक कामास सुरुवात केली.
त्यामुळे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांचा अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे यांनी सत्कार केला यावेळी माजी पं. स.सदस्य महेश देशमुख, गोविंद सूर्यवंशी, अप्परजित मरगणे, अजय कांबळे उपस्थित होते.