• Fri. May 2nd, 2025

खाडगाव स्मशानभूमी दुरावस्था, सुसज्जीत करण्याची मागणी

Byjantaadmin

May 23, 2023
खाडगाव स्मशानभूमी दुरावस्था, सुसज्जीत करण्याची मागणी.
लातूर शहरातील खाडगाव समशानभूमीची दुरावस्था झालेली आहे, स्मशानभूमीच्या भिंतींना मोठमोठया भगदाडी पडल्या आहेत, परिसरातील लोक स्मशानभूमीचा वापर सार्वजनिक शौचकार्यासाठी करतात, आतमध्ये गटारीचे पाणी वाहत येते, दारुडे लोक दारू पिऊन पडलेले असतात, याठिकाणी कधीही स्वच्छता केली जात नाही, डुकर फिरतात, कुत्रे हाडं उकरून नेतात, उघड्यावर हाड सापडतात, उघड्यावरती प्रेत जाळलं जातं, जिथे गरम राखे वर कुत्री ऊब घेण्यासाठी बसतात, हाथ पाय धुवायला पाणी नसतं, याठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, अस्वच्छतेचे माहेरघर अशी ही खाडगाव स्मशानभूमी. येथील बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, विद्युत दाहिणीचे काम अर्धवट अवस्थेत आहे.लातूर शहरात सर्व सुविधांनी युक्त स्मशानभूमी नसावी हे लातूरकरांचे दुर्दैव आहे. आज ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून तीन ट्रॅक्टर अंत्यविधीचे साहित्य पाला पाचोळा केर कचरा हाडांचे तुकडे एकत्रित केले., झाडांना पाणी देण्यात आले.
लवकरच लवकर समशानभूमी चे कार्य पूर्ण करावे, याठिकाणी पाणी टाकी, लाईट, चौकीदार, स्वच्छता या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, भावनिक गैरफायदा घेत पैसे उकळले जातात त्यावर निर्बंध आणावेत असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीम द्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *