केंद्रातील भाजप सरकारकडुन ईडीचा गैरवापर करुन विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असले बाबत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध
निलंंगा/प्रतिनिधी
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या यंञणांच्या गैरवापर बंद करावा अशा मागणीचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना देण्यात आले.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने केंद्रातील भाजप सरकार चा निषेध करण्यात आला.
केंद्रातील भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर करण्यासाठी इ डी चा वापर करून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना त्रास देण्याचा सतत प्रयत्न करण्यात येत आहे. मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मा खासदार शरद पवार यांना ईडीची नोटीस देऊन परत घेतली. त्यानंतर आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर अनेक वेळा धाड टाकली पण त्यात काही मिळाले नाही. आता शेजारच्या कर्नाटक राज्यात जनतेने भाजपची सत्ता उलटवून त्या ठिकाणी काँग्रेसची बहुमताने विजयी कौल दिला.महाराष्ट्रात येणाऱ्या 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक लागत आहेत त्यात महाविकास आघाडीने कंबर कसून प्रमुख शहरात सभा घेऊन केंद्रातील सरकार कढून सत्तेचा गैरवापर कशा पध्दतीने केला जात आहे .याबाबत जनतेला जाणीव करुन दिली जात आहे.त्यामुळे भाजपा भयभीत होऊन महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावून दि२२/५/ 2023 ला ईडीचा कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे भाजपाच्या दुटप्पी कुटील धोरणाचे विरोधात 22 मे 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.राष्ट्रवादी नेतेआमदार जयंत पाटील यांच्यावर जे आरोप केले आहेत ती केंद्र शासनाने मागे घेण्यात यावे असे निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले आहे या निवेदनावर निलंगा विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे,जिल्हा उपाध्यक्ष महादेवी ताई पाटील, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, जिल्हा उपाध्यक्ष अंगदराव जाधव, उपसरपंच जेवरी लक्ष्मण क्षिरसागर, मुस्ताक बागवान, संगीता ताई कदम,विकास शिंदे ,निलेश गायकवाड ,जगन्नाथ गायकवाड, शुभम कांबळे,चेतन गायकवाड, रोहित पाटील, सुमित जाधव,जगदीश लोभे,इफरोज शेख, यांच्यासह निलंगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.