• Sat. May 3rd, 2025

‘या’ पक्ष्याचे घरटे शेतात आढळल्यास शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार; राज्य सरकारचा निर्णय

Byjantaadmin

May 21, 2023

तुमच्या शेतात सारस पक्ष्याचे घरटे असेल तर तुमचे शेत वनकायद्याने पडीक राहणार, अशी भिती वाटत असेल तर घाबरू नका. सारस पक्षी शेतात आढळलेल्यां शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. तुमच्या शेतात सारस पक्ष्याचे बस्तान असल्यास तुम्हाला 10 हजार रूपये मिळणार आहे. होय हे खरं आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकार तयारी करीत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी, सुकळी नकुल, गोंदेखारी, वाहनीच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात बिनाखी, सुकळी नकुल, गोंदेखारी, वाहनी गावातील शेतशिवारात सारस पक्षाचे जोडपे आढळले आहे. आता शेती म्हटलं की रासायनिक खते, औषधं आलेच. मात्र, हे सर्व सारस पक्षांसाठी घातक आहेच. दिवसेंदिवस सारस पक्षांच्या संख्येत घट होत आहे. सारस पक्षी हा जोडीने राहत असतो, एक जोडीदार मृत झाला की दुसरा पक्षी सुध्दा मृत होतो. प्रेमाचं प्रतीक म्हणुन सारस पक्षांची ओळख आहे. सारस पक्षांचा अधिवास भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतात आढळून येत आहे. त्यामुळे सारस पक्षाच्या संखेत वाढ व्हावी यासाठी सरकारने पुढाकार घेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्ष्यांचे घरटे आहेत अश्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याचा फायदा सारस भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *