कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 8 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला राहुल गांधी, प्रियांका गांधी व कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसह 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांची देखील शपथविधी सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ..
डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर सतीश जारकीहोली, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
या नेत्यांची होती प्रमुख उपस्थिती…
सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला नऊ विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. यामध्ये मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), नितीश कुमार (जेडीयू), तेजस्वी यादव (एआरजेडी), डी राजा आणि सीताराम येचुरी (डावे), एमके स्टॅलिन (डीएमके), शरद पवार (राष्ट्रवादी), फारूख अब्दुल्ला (राष्ट्रीय काँग्रेस), कमल हसन यांचा समावेश आहे.
- आज शपथ घेणारे मंत्री काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि हायकमांडच्या थेट संपर्कात आहेत. त्यामुळेच त्यांना मंत्री करायला हरकत नव्हती. त्याचवेळी, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार गटाच्या ज्या आमदारांना मंत्री केले जाणार आहे, त्यांचा हायकमांडशी थेट संबंध नाही. त्यांचा नंतर मंत्रिमंडळात समावेश केला जाईल.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला जाऊ शकतात. तिथे कोणत्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा हे ठरवले जाईल. मंत्रिमंडळात एकूण 34 मंत्र्यांचा समावेश होणार आहे. आतापर्यंत फक्त 8 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
-
- मुख्यमंत्री कुरुबा आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे वोक्कलिका जातीतील आहेत. याशिवाय, डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, प्रियांक खरगे हे एससी प्रवर्गातील आहेत. सतीश जारकीहोळी एसटीचे, एमबी पाटील लिंगायत समाजाचे, केजी जॉर्ज हे ख्रिश्चन तर जमीर अहमद खान मुस्लिम व रामलिंगा हे रेड्डी रेड्डी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
- 8 पैकी सर्वात जास्त 3 मंत्री SC प्रवर्गातील, दक्षिण कर्नाटकाला प्राधान्य
-
पहिल्या मंत्रिमंडळात उत्तर कर्नाटकाऐवजी दक्षिण कर्नाटककडे लक्ष देण्यात आले आहे. दक्षिण कर्नाटकातून 5 मंत्री आहेत, तर उत्तरेतून फक्त 3 मंत्री आहेत. त्याचवेळी, 8 पैकी जास्तीत जास्त 3 मंत्री अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. बाकी समाजातील आमदारांना देखील मंत्री करून काँग्रेसने सामाजिक संदेश दिला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर डीके मुख्यमंत्री होतील.
शिवकुमार यांनी ५०-५० फॉर्म्युला मान्य केला आहे. पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर पुढील अडीच वर्षे डीके असतील. म्हणजे 2025 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर डीके मुख्यमंत्री होतील. मात्र, त्यानंतर कर्नाटकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याचे नाव अद्याप ठरलेले नाही.