• Sun. May 4th, 2025

आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नांने ग्रामीण भागात पाणी टंचाईला बसणार आळा….

Byjantaadmin

May 20, 2023

आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नांने पाणी टंचाईला बसणार आळा….

अटल भूजल योजना मतदार संघात मोठ्या प्रमाणात राबवणार…

माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून निलंगा तालुक्यात पाणी पातळीत वाढ करण्यासाठी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून अनेक गावात पाणी रिचार्ज बोअरवेल घेतले जात आहेत…

निलंगा/प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून निलंगा तालुक्यातील १७ गावचा समावेश अटल भूजल योजनेत करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यात एकून १७ गावे गावे आहेत.त्यात बेंडगा गावापासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.निलंगा तालुक्यातील बेंडगा गावात ४७ रिचार्ज बोअरवेल घेण्यात आले असून या माध्यमातून गावातील काही भागात २० बाय २०० लांबीचे व एक मिटर खोटीचे चर खोदून त्यातील प्रत्येक चरामध्ये तीन बोर घेण्यात आले आहेत.याचा लाभ जमीनीतील पाणी पातळी वाढ होण्यासाठी होणार आहे.तसेच या योजनेचा १७ गावातील भूजल पाणी पातळी वाढण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.ग्रामीण भागात होणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी ही योजना अमलात आणली असून याचा जमीन पातळीतील पाणी साठा वाढण्यासाठी होणार आहे.ग्रामीण भागातील गावात अती पाणी उपसा होत असल्याने भविष्यात याचा मोठा ञास नागरिकांना होत असतो याचा विचार करून माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी ही योजना तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पाणी टंचाईग्रस्त गावांना टंचाई मुक्त करण्यासाठीच हे मोठे पाऊल उचले असल्याचे या माध्यमातून दिसत आहे.निलंगा तालुक्यात व मतदार संघातील अनेक गावात या अटल भूजल योजनेचा लाभ होणार आहे.जमीतील अती उपसा व भविष्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता ही अटल भूजल योजना मोठ्या प्रमाणात राबण्यासाठी केंद्र व राज्य यांच्याकडे शिफारस व मागणी केली आहे.जास्तीतजास्त ही योजना मतदार संघातील गावामध्ये राबवून पाणी पातळीत वाढ करण्यासाठी आमदार निलंगेकर प्रयत्न करत आहेत.

अटल भूजल या योजनेचा शुभारंभ निलंगा तालुक्यातील बेंडगा गावापासून करण्यात आला असून याचे उदघाटन निलंगा गरेदी विक्री संघाचे चेअरमन सत्यवान धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला आहे…

यावेळी गावातील सरपंच मोहरबाई धुमाळ,उपसरपंच वैजनाथ तळबुगे , सलीम सय्यद ,माधव धुमाळ, उशाबई धुमाळ, वसंत धुमाळ दयानंद धुमाळ,आत्माराम धुमाल ,रवी गिरी, टिंकु धुमाळ , दत्ता प्रकाश धुमाळ ,मेजर गोविंद धुमाळ , बालाजी धुमाळ आदि उपस्थीत होते.

 

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील बेंडगा गावात ४७ रिचार्ज बोअर व एकून २० चर खोदून त्यात प्रत्येकी तीन बोअर घेण्यात आले आहेत.यामुळे जमीनीतील पाणी पातळी वाढणार आहे.व हे संपूर्ण गावे टंचाई मुक्त होणार आहेत.उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी महिलांची भटकंती थांबावी व प्रत्येक गाव टँकरमुक्त व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण ही योजना निलंगा मतदार संघात मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याचे आमदार निलंगेकर यानी सांगितले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *