• Sun. May 4th, 2025

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे स्मारक उभारण्यासाठी लातूरकरांचा पुढाकार

Byjantaadmin

May 20, 2023

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे स्मारक उभारण्यासाठी लातूरकरांचा पुढाकार

समाजसेवक निवृत्ती यादव आणि माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांचा पुढाकार

लातूर : देशाचे पहिले सीडीएस दिवंगत जनरल बिपीन रावत यांच्या जन्मगाव सैंण (उत्तराखंड) येथे भव्य स्मारक उभारणी, पशुपतीनाथ मंदिर उभारणी व्हावी यासाठी माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांच्या प्रेरणेने लातूर येथील समाजसेवक निवृत्ती यादव यांनी पुढाकार घेतला आहे. देशासाठी बलीदान देणारे जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहून त्यांच्या देशसेवा व समर्पणाची चिरकाल आठवण रहावी यासाठी यादव यांनी पुढाकार घेऊन लातूरकारांच्या दानत्वाची व सामाजीक जाणीवेची परंपरा कायम राखली आहे.लातूरपासून साधारण 2000 किमी अंतरावर राष्ट्रसंतांच्या जन्मगावी आयोजित ह्या कार्यक्रमात निश्चितच लातूरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

या कार्यक्रम प्रसंगी उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री श्री. तीर्थसिंह रावतजी, परमार्थ निकेतन चे संस्थापक अध्यक्ष स्वामी चिदानंदजी आणि माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री, खासदार पौढी गढवाल, तीरथ सिंह रावत, कर्नल सतपाल परमार, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी स्वत: साठी जगणाऱ्या लोकांच्या मृत्यू नंतर समाज त्यांना विसरुन जातो पण जे समाज संस्कृती, संस्कार आणि राष्ट्रासाठी जगतात, आपले बलिदान देतात त्यांना समाज कधी ही विसरत नाही तर त्यांची आठवण ठेवतो. समाजात जगत असताना परमार्थ करत जिवन जगावे असा संदेश परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानन्द सरस्वती यांनी दिला. तर  या स्मारकास आणि मंदिरास कुठलाच निधी कमी पडणार नाही असे वचन माजी मुख्यमंत्री रावतजी यांनी दिले. तर देशाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असणारे हे स्मारक “शक्तीस्थळ ” म्हणून लौकिक प्राप्त करेल असे प्रतिपादन माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे केले.डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान, लातूर,महाराष्ट्र व उत्तराखंड सरकारच्या वतीने आयोजित

                पुढे बोलताना स्वामी चिदानंद म्हणाले की, सैंण गावाने भारतीय सैनेचा मान वाढवला आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे व्यक्तीमत्व हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बिपिन रावत हे भारताचे सर्वश्रेष्ठ रत्न होते. त्यांचे बलिदान देश कधी ही विसरणार नाही. येणाऱ्या सर्व पिढ्या त्यांचे योगदान आठवणीत ठेवतील. निवृति यादव यांनी डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून बिपिन रावत यांच्या जन्मभूमि मध्ये त्यांचा पुतळा व भगवान पशुपतिनाथ मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला ही आनंदाची बाब आहे. यामुळे नेपाळ व भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध अधिक मजूब होतील.

                 माजी मुख्यमंत्री खासदार पौडी गढवाल यांनी यावेळी समयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमा दरम्यान केन्द्रीय वित्त राज्यमंत्री, वित्त मंत्रालय, भारत सरकार, डॉ. भागवत कराड़ यांनी व्हिडीओ संदेश देवून आपल्या बिपिन रावत यांचे योगदान देश कधी विसरनाही, त्यांची देशसेवा व निष्ठा नेहमी प्रेरणा देत राहील असा संदेश दिला.

सदरील कार्यक्रमास कैप्टन सुरेंद्र सिंह रावत, भरत सिंह रावत, यादव जी, हरिनन्दन सिंह रावत, विजय सिंह रावत, हरिश रावल, ब्लाक प्रमुख महेन्द्र राणा, स्वामी जयंत सरस्वती, आचार्य दीपक शर्मा, बरवाना गुरूकुल, कण्व आश्रम गुरूकुल, परमार्थ निकेतन गुरूकुल चे आचार्य, ऋषिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *