• Sun. May 4th, 2025

भाजपचे हिंदुत्व हे ‘गोमूत्रधारी’च; ठाकरे गटाची सामना अग्रलेखातून सडकून टीका

Byjantaadmin

May 19, 2023

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधल्या एका घटनेमुळे राज्यातील राजकारणाने पेट घेतला आहे. एकीकडे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लीम व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे हे तरुण गेल्या कित्येक वर्षाच्या परंपरेनुसार देवाला धूप दाखवण्यासाठी आले होते, असेही म्हटले जात आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्वाच्या नावावर दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील संयमी आणि शहाण्या जनतेमुळे हे कारस्थान तडीस गेले नाही, अशा शब्दात ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

“भारतीय जनता पक्षाला असे वाटते की, जगातील हिंदुत्वाचे तेच एकमेव ठेकेदार मात्र या स्वयंदिनी आपल्या हाताखाली उपठेकेदार नेमून देशात हिंदुत्वाच्या नावाने जो कर्कश गदारोळ घातला आहे तो पाहता ही हिंदुहृदयसम्राट वीर तात्याराव सावरकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपला शाप देत असतील, हिंदुत्व हे ‘गोमूत्रपारी’च आहे. त्यांच्या हिंदुत्वास ना आया ना पिछा विचारांचा ध-बुहखा तर अजिबात नाही है त्र्यंबकेश्वरमध्ये घडवून आणलेल्या घटनांवरून सिद्ध झाले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्वाच्या नावावर दंगल पहनून महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटविण्याची योजना हिंदुत्वाच्या उपठेकेदारांनी योजली, पण नाशिक-त्र्यंबकच्या संयमी व शहाण्या जनतेमुळे हे कारस्थान तडीस गेले नाही”, असेही सामना अग्रलेखात नमूद करण्यात आले.

तसेच युवा मोर्चा, “ब्राह्मण संघाचे पुढारी पोहोचले व त्यांनी मंदिराच्या पाययांचे परिसराचे गोमूत्राने सुद्धीकरण केले. देवळात व बाहेर हे सुद्धीकरणाचे नाटक सुरू असताना गावात मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन सलोख्याचे दर्शन घडवले त्यामुळे गोवारी हिदुत्वाच्या उपठेकेदाराचे कारस्थान उधळले गेले व सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला तस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या पोरकट संघटनांना मंदिराचे शुद्धीकरण करण्याचे क्वाट कोणी दिले? हिंदुत्वाच्या नावावर सुरू असलेली ही काळाबाजारी दुकाने बंद केली जात नाहीत तोपर्यंत हिंदुत्वाचे हसेच होईल. भारतीय जनता पक्षाला वीर सावरकर व त्याच्या हिंदुत्वाचा सध्या जरा जास्तच पुळका आला आहे. ऊठसूट ते वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचे दाखले देत असतात”, असेही अग्रलेखातून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *