• Sun. May 4th, 2025

महिनाभरात शाळा सुरू होणार, मात्र अद्याप समान गणवेश धोरणाचा निर्णयच नाही!

Byjantaadmin

May 19, 2023

मुंबई : नवीन ( New Academic year) 15 जून पासून सुरू होत आहे. यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळांसाठी एक रंग एक गणवेश (School Uniform) धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाचा रंग कोणता असेल? याबद्दल निर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्या गणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे

Education School will start in a month but uniform policy is still not decided of government schools in the state Uniform Policy:  महिनाभरात शाळा सुरू होणार, मात्र अद्याप समान गणवेश धोरणाचा निर्णयच नाही!

 

राज्यात ‘एक रंग एक गणवेश’ धोरण यावर्षी राबवले जाणार की पुढल्या वर्षी ? यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर सुद्धा हे धोरण नेमकं कधी राबवले जाणार? याबाबत स्पष्टता दिलेली नाही.

गणवेश कापड खरेदीची ऑर्डर कधी द्यायची?

गणवेशाचा रंगच माहित नसल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो.  त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. मात्र नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. अद्याप अधिकृत निर्णय न झाल्याने शाळा व्यवस्थापन समोर गणवेश कापड खरेदीची ऑर्डर कधी द्यायची? गणवेश कधी शिवून घ्यायचे ? असा प्रश्न उभा राहिला आहे

गणवेश बदल करायचा असल्यास आणि सर्व राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश करायचा असल्यास त्या संदर्भात अधिकृत निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांकडून केली जात आहे. जर यावर्षी हा निर्णय लागू होणार नसेल त्या प्रकारे अधिकृतरित्या परिपत्रकानुसार माहिती द्यावी जेणेकरून शाळांमध्ये गणवेशासंदर्भात संभ्रम राहणार नाही असं शाळा व्यवस्थापनाचे म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *