• Sun. May 4th, 2025

ठाकरे गटातील वाद पेटला,बीड जिल्हाप्रमुखांची तडकाफडकी हकालपट्टी; काय आहे प्रकरण?

Byjantaadmin

May 19, 2023

बीडमध्ये महाप्रबोधन सभेदरम्यान ठाकरे गटातील वाद उफाळून आला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची धक्कादायक घडली आहे.

Shivsena (Thackeray Group) News, Appasaheb Jadhav

याचवेळी गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. आता ठाकरे गटाकडून अप्पासाहेब जाधव यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बीड शहरातील महाप्रबोधन यात्रेची सभा शनिवारी (दि.२०) होणार आहे. यादरम्यानच ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रबोधन यात्रेदरम्यान, पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीचा ही प्रकार घडला. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *