नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना दिवसेंदिवस गर्दी वाढतांना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमात गोंधळ, गदारोळ आणि गैरप्रकार होतांना दिसत आहेत. शिवाय अपघातही होत आहेत.छोटा पुढारी घनःश्याम दराडे याने थेट गौतमी पाटीलला इशारा दिला आहे. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करु नये, नाहीतर मी मुसंडी मारेन असं त्याने म्हटलं आहे
छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनःश्याम दराडे याचा मुसंडी नावाचा चित्रपट येत आहे. त्यानिमित्त तो आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेला होता.गौतमी पाटील ही लावणीला बदनाम करीत असल्याने दराडेने म्हटलंय.घनश्याम म्हणाला की, गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न करु नये नसता आपण मुसंडी मारु. आपला आणि तिचा कोणताही वाद नाही परंतु ती लावणीला बदनाम करीत आहे. तिने आमचा मुसंडी चित्रपट घावा, असं आवाहन त्याने केलंय.अजित पवारांवर बोलतांना घनःश्याम म्हणाला की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जसा शरद पवार यांचा आहे तसाच तो अजितदादांचाही आहे. अजितदादा कधीही शरद पवारांना सोडून जाणार नाहीत, असंही त्याने म्हटलं आहे.दरम्यान, गौतमीवर घनःश्यामने टीका केल्याने सर्वत्र चर्चा होत आहेत. घनःश्यामचा मुसंडी चित्रपट येत आहे. त्याचं त्याने ज्या पद्धतीने प्रमोशन केल्याचं बोललं जातंय. आता गौतमी पाटील घनःश्यामच्या टीकेवर काय बोलणार, याकडे लक्ष लागलं आहे.