नांदेड मार्गे महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी दाखल झालेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे (BRS News) राज्यस्तरीय पदाधिकारी शिबीरही नांदेडमध्येच होत आहे. महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारंसघात निवडणूक लढवण्याच्या तयारीचा भाग म्हणून या शिबीराकडे पाहिले जात आहे.
यापुर्वी हैदराबादेत केसीआर यांनी मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतच शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर येत्या १९ व २० मे रोजी नांदेडला होणार आहे.
येथील “अनंता लॉन्स” येथे होणाऱ्या या शिबीरासाठी kcr हे उपस्थित राहणार असल्याची माहिती किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली आहे. maharashtra प्रत्येक गावखेड्यात तेलंगणात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पोहचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
तेलंगना मॉडेलची चर्चा आता सर्वसामान्यांमध्येच नाही तर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील होवू लागल्याचे बोलले जाते. भारत राष्ट्र समातीने राज्यातील सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून नांदेड येथे १९ व २० मे रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राज्य स्तरीय पहिले प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात भारत राष्ट्र समितीची ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा कोअर कमिटी स्थापना अभियान, महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाय योजनांसह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, विधानसभा निवडणुकांची तयारी,पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान व प्रचार या संबंधाने चर्चा होणार आहे. शिबिरात फक्त निमंत्रीत सदस्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या शिबीरार्थींची निवास व्यवस्था गुरुव्दारा येथील पंजाब भवन येथे करण्यात आली आहे.