• Sun. May 4th, 2025

“केवळ प्रसिद्धीसाठी वानखेडेंनी मला आर्यन केसमध्ये अडकवलं अन् ज्यांच्याकडे ड्रग्ज होतं त्यांना सोडलं”

Byjantaadmin

May 18, 2023

मुंबई NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मुक्त करण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांनी उद्या (गुरुवार) चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणातून लवकर सुटका होण्यासाठी समीर वानखेडे यांनी सुशातसिंह प्रकरणात आरोपी होण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट करण सजनानी याने केल्यानंतर वानखेडेंवर आणखी एक बॉम्ब पडला आहे. आता मॉडेल मुनमुन धामेचाने (Munmun Dhamecha) वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी मला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकवलं असल्याचंधमेचाने म्हटलं आहे.

मुनमुन धामेचा हिने म्हटले आहे की, वानखेडे यांचा उद्देश्य केवळ माध्यमांचे लक्ष आकर्षित करणे होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धमेचाने सांगितले की, समीर वानखेडे हे पॉवरफूल अधिकारी आहेत, त्यामुळे आधी त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत झाली नाही. आता त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने मी त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली आहे

मुनमुन धामेचा म्हणाली की, त्या पार्टीत ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले त्यांना सोडून दिले. तिला क्रूझ पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिला क्रूझमध्ये एक खोली देण्यात आली. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी खोलीत इतरही लोक होते, मात्र अधिकारी व्हीव्ही सिंग यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ज्यांना सोडले, त्यांच्याकडे ड्रग्ज सापडले होते. दरम्यान, मुनमुन धमेचावर ५ ग्रॅम चरस खरेदी केल्याचा आरोप आहे.क्रूझ पार्टीत ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली मॉडेल मुनमुन धामेचाला अटक करण्यात आली होती. मुनमुन धमेचाने म्हटले की, वानखेडे सातत्याने मॉडेल आणि सेलिब्रिटींना टार्गेट करत होते. यातून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा हेतू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *