लग्नासाठी संसार उपयोगी साहित्य देऊन शेतकरी कन्येचे सरपंचाने केले कन्यादान
निलंगा/प्रतिनिधीः- बेंडगा ग्रामपंचायतकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या कन्यादान योजने अंतर्गत कै. तात्याराव कडाजी धुमाळ यांच्या स्मरणार्थ डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावात नवीन लग्न ठरलेल्या मुलीस 11 हजार रूपयांचे संसार उपयोगी साहित्य बेंडगा गावच्या सरपंच श्रीमती मोहरबाई धुमाळ यानी दिले आहे.
निलंगा तालुक्यातील बेंडगा येथील अनिता सिध्देश्वर सोळुंके या मुलीचा विवाह मंगरूळ येथील जाधव परीवारातील माधव यांच्याशी जुळला आहे. 1 जून रोजी विवाह मंगरूळ येथे होणार असून बेंडगा गावच्या सरपंच श्रीमती मोहरबाई धुमाळ यानी गावातील लेकमातीला 11 हजार रूपयांचे संसार ऊपयोगी साहित्य भांडे देण्याचे त्यांची सरपंच पदी निवड झाल्या दिवशीच जाहीर केले होते. त्यांनी जाहीर केलेला निर्णय खुद्द कृतीत उतरवत कन्यादान योजनेचे आपले कर्तव्य पार पाडले आहे. सरपंच मोहरबाई यानी सुकन्या व कन्यादान योजनेच्या माध्यमातून बेंडगा गावातील लेकमातीला याचा लाभ देण्यास सुरवात केली आहे. शेतकर्यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी करत असलेली ही मदत मोलाची ठरत असल्यामुळे संपूर्ण गाव सरपंच मोहरबाई यांचे निर्णयाचे कौतुक करत आहे.
यावेळी गावातील सत्यवान धुमाळ, ग्रामसेवक राजकुमार तोडकर उपसरपंच वैजनाथ तळबुगे, विकास सोसायटीचे चेअरमन – शिवाजी धुमाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, छायाबाई गिरी , श्रीमंत धुमाळ, दैवताबाई सुर्यवंशी, उषाबाई धुमाळ, ओमगीर गिरी व गावातील नागरिक पंढरी तळबुगे, बंडू धुमाळ, संजय सबनिस, आनंदराव धुमाळ, सुरेखा जगताप, प्रयागबाई जगताप, सुनंदा कांबळे, वंदनबाई तळबुगे, लक्ष्मीबाई धुमाळ, कोमलबाई धुमाळ, सुवर्णा धुमाळ, गुलाब गीर, हाणमंत गीर,विठ्ठल पाटील, अमृत धुमाळ, हाणमंत माळकरी, गोविंद सोळूंके, प्रकाश कारभारी, विठ्ठल कांबळे, गणेश धुमाळ आदि गावातील महीला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.