शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना लातूर जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाची अंमलबजावणी ;सिबिल स्कोर नुसार १०.५०% ते १२.५० टक्के व्याज दर आकारणार
जिल्हा बँक व इतर बँकेत पगार होणाऱ्या शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यास सहजपणे मिळणार कर्ज
कर्ज देण्यासाठी अत्याधुनिक जलद सेवा
बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची माहिती
लातूर ; लातूर जिल्ह्यातील शेतकर्याची व पगारदार संस्थांची आर्थिक जीवनवाहिनी समजली जाणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आता जिल्ह्यातील शासकिय व निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांना वैयक्तिक कर्ज पुरवठा करणार येत असून मागेल त्याला त्यांच्या पगारी नुसार कुठलीही मर्यादा न ठेवता त्यांना कर्ज पुरवठा होत असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे दरम्यान जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच शासकिय व निमशासकीय पगारदार लोकांना वैयक्तीक कर्ज पुरवठा करत असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे बँकेकडे कर्ज पुरवठा मागणी करणाऱ्या पगारदार कर्मचारी बालाजी चिंचोलिकर यांना ३० लाख रुपये तर योगिनी केंद्रे यांना २० लाख रुपये व सोमनाथ कांबळे यांना २० लाख रुपये कर्ज मंजुरी पत्राचे वाटप बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा बँकेने शासकिय व निमशासकीय पगारदार लोकांना वैयक्तीक कर्ज पुरवठा सुरू केल्याने जिल्ह्यांतील अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे ईतर बँकेपेक्षा जलद गतीने सेवा देण्याचा प्रयत्न बँक प्रशासनाकडून होणार असल्याचे सांगण्यात आले
*आता जिल्हा बँकेसह व ईतर बँकेत पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्ज पुरवठा*
जिल्हा बँकेच्या कर्ज वितरणात विविधता निर्माण करून सुरक्षित व निश्चित स्वरूपाच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने पगारदार कर्मचाऱ्यांना जिल्हा बँकेसह ईतर बँकेत पगार असणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना कर्ज पुरवठा करणार आहे आता मात्र कुठलीही मर्यादा न ठेवता कर्मचाऱ्याचा पगार बघून त्यांना कर्ज पुरवठा होणार आहे त्यासंदर्भात कर्ज मंजुरीचे बँकेने धोरण स्वीकारले असून माहे एप्रिल अखेर या बिगर शेती अंतर्गत पगारदार ११,४१६; कर्मचाऱ्यांना तब्बल ३०१ कोटी ४९ लाख रुपये कर्ज पुरवठा केला आहे मध्यम मुदतीचे कर्जाची परतफेड ८ वर्षात करावी लागणार आहे .
*शासकीय व नीम शासकीय कर्मचारी यांनी कर्जासाठी लाभ घ्यावा*
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात टॉप पाच मध्ये असून बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करीत आहेत त्याच बरोबर आता शासकिय व निमशासकीय कर्मचारी यांना वयक्तिक कर्ज पुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले असून यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे .