• Sun. May 4th, 2025

कारखाना सक्षमपणे चालवून निलंगेकरांची स्वप्नपुर्ती करणार -चेअरमन बोञे पाटील

Byjantaadmin

Oct 21, 2022

कारखाना सक्षमपणे चालवून निलंगेकरांची स्वप्नपुर्ती करणार -चेअरमन बोञे पाटील

कारखान्याचे ८५ टक्के काम पूर्ण लवकरच गळीत हंगाम…

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना (लिज)ओंकार साखर कारखाना दुरूस्तीचे ८५ टक्के पूर्ण झाले असून लवकरच कारखान्याचे गळीत सुरू होणार आहे. अत्यधुनिक मशिनरीचा वापर करण्यात आल्याने हा कारखाना सक्षमपणे चालवून दाखवू अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोञे पाटील यानी दिली.

गेल्या एक तपापासून बंद असलेला शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता.माञ राज्य शिखर बँकेने हा कारखाना ओंकार साखर कारखाना याना भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला आहे.कारखान्याच्या दुरूस्तीचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू असून अत्याधुनिक तंञज्ञानाचा वापर करून जास्त क्षमतेने गाळप करून हंगाम सुरू करणार आहे.कारखान्यात अधुनिक तंञज्ञानाचा वापर केल्यामुळे चौदाशे कर्मचाऱ्यांवरून वरून फक्त तिनशे चाळीस कर्मचारी पूर्ण कारखान्याचे काम करणार आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा भाव देण्याचा माणस असल्याचे बोञे यानी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर कारखाना परीसरात ऊसाच्या अनेक नविन व चांगला साखर उतारा तसेच टनेज देणाऱ्या जातीचे ऊस बेण्याचे प्लाॕट प्रात्यक्षिक विकसित करण्यात येणार आहेत.शेतकऱ्याच्या ऊसाला अधिक भाव देता यावा यासाठी लवकरच को जनरेशन व डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंजूरी मिळाली असून लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरू होणार आहेत.

गतवर्षी कारखान्याला ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती काही शेतकऱ्यांनी ऊस फडाबाहेर निघत नसल्यामुळे कंटाळून उभ्या ऊसाला पेटवून देण्याचे प्रकार तालुक्यात घडले होते.ऊसाच्या फडाचे नारळ ऊस घेऊन जाण्यासाठी फोडले परंतु ऊसतोड कामगारांची टोळी न आल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस सत्तरा आठरा महिणे फडातच उभा राहिल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता.शेतकऱ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी विशेष प्रयत्न करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव व वेळेत ऊस फडाबाहेर काढण्याचा आमदार निलंगेकर यांचा हेतू आहे.म्हणूनच कारखाना परीसरात को.जनरेशन व डिस्टलरी प्रकल्प आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरू होणार असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

हा कारखाना चालू झाल्यामुळे कारखाना आणि परीसरातील दहा हजार लोकांची वर्दळ वाढणार असून निलंगा शहरात व परीसरातील व्यापाराला चालना मिळणार आहे.असा अशावाद बोञे पाटील यानी व्यक्त केला आहे.

 

स्पर्धेच्या युगात साखर कारखानदारीपुढे खुप मोठे अव्हान आहेत.ते पेलण्यासाठी उच्च व गुणवत्तापूर्ण साखर निर्माण व्हावी म्हणून अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे.यामुळे उच्च प्रतिची साखर निर्माण होणार आहे.त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळणार आहे.ही अत्याधुनिक मशिनरी असून देशातील तीन कारखान्याकडे आहे.निलंगा येथील निलंगेकर कारखान्याचा राज्यात चौथा क्रमांक असल्याचे त्यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *