शिवसेनेच्या आंदोलनाला यश,हासोरी भूकंप भयग्रस्त यांच्या निवाऱ्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू
निलंगा (प्रतिनिधी)निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी बुद्रुक व हासोरी खुर्द व परिसरात होणाऱ्या सततच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना तात्काळ निवाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आले.
निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी व परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी ग्रामस्थांना भेट दिली तेव्हा ग्रामस्थांनी 1993 च्या किल्लारी भूकंपाचा हवाला देत तशीच परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे सांगत तात्पुरते निवाऱ्याची व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे गाऱ्हाणे मांडले तेव्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रशासनाकडे ही मागणी लावून धरण्यासाठी अगोदर लेखी निवेदन देण्यात आले त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही म्हणून ग्रामस्थ सोबत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले गेल्या तीन दिवसापासून ग्रामस्थांना सोबत घेऊन अमरण सुरू केले होते तरीही प्रशासन दखल देत नाही याची जाणीव होतात आज शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली यातच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले तर अनेक उपोषण कर्त्यांची तब्येत खालावू लागली यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन निलंगा येथील उपजिल्हाधिकारी डॉक्टर शोभा जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आज तात्काळ घटनास्थळी येऊन गावातील प्रत्येक घरांचा सर्वे करून त्या घरातील असलेल्या व्यक्तींची संख्या व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गावामध्ये पाठवण्याचे व निवारा उभा करून देण्याची व्यवस्था करण्यासाठीचे लेखी आश्वासन ग्रामस्थांच्या समोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांना देण्यात आले यानंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शोभा जाधव यांच्या हस्ते शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सह संपूर्ण ग्रामस्थ सर्व लोकप्रतिनिधी संघटितपणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य हरिभाऊ सगरे विष्णू साबदे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर तालुकाप्रमुख अविनाश रेश्मे लातूर येथून आलेले सुनील बसपुरे तानाजी सूर्यवंशी तालुकाप्रमुख बाबुराव शेळके ईश्वर पाटील बालाजी माने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम सतीश फट्टे महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवता सगर सुवर्णा वाघमारे अरुणा माने प्रीतीताई कोळी युवा सेनेचे पृथ्वीराज निंबाळकर ऋषी मोहोळकर अर्जुन नेलवडे नागनाथ बाबळसुरे शिवाजी चव्हाण यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते