चांदवड : तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे पैसे देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून सरपंच बाकेराव जाधव व ग्रामसेवक आतिश शेवाळे यांनी १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
अशी आहे घटना
बोराळे ग्रामपंचायतीच्या लोखंडी जिन्याचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये ५० हजार रुपयांना तक्रारदाराला देण्यात आले होते. या कामाचे उर्वरित २० हजार रुपये बिल मिळावे यासाठी तक्रारदार प्रयत्न करीत होते. उर्वरित पैसे देण्याच्या मोबदल्यात सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव (५०) याने फोनवरून स्वतः व ग्रामसेवक आतिष अभिमान शेवाळे (२८) या दोघांसाठी तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वैशाली पाटील, पोलिस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गिते, परशराम जाधव यांच्या पथकाने केली