• Mon. May 5th, 2025

राहुल गांधी जाणार अमेरिका दौऱ्यावर, नरेंद्र मोदींच्या आधी मॅडिसन स्क्वेअरवर सभा

Byjantaadmin

May 16, 2023

काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी ३१ मे रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा १० दिवसांचा असणार आहे. ४ जून रोजी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी राहुल गांधी एनआरआय बांधवांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे ५ हजार एनआरआय असणार आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पॅनल चर्चेतही राहुल गांधी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला जातील आणि तिथल्या नेत्यांना भेटणार आहेत तसंच उद्योजकांनाही भेटणार आहेत.

Rahul Gandhi on US Visit from 31st May

२२ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जूनला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच राहुल गांधी यांचा हा दौरा असणार आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी याच वर्षी मार्च महिन्यात लंडनचा दौरा केला होता. त्यावेळी केंब्रिज विद्यापीठात भाषण केलं होतं. त्यावेळी भारतात लोकशाहीवर सातत्याने हल्ले होत आहेत असं वक्तव्य केलं होतं. rahul gandhi यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपाने सातत्याने त्यांना लक्ष्य केलं होतं. तसंच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशीही मागणी केली होती. आता राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. तिथे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *