पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते. आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचे किती आमदार, खासदार आहेत ते पाहावं आणि नंतर आमच्यावर बोलवं, असा खोचक टोला नारायण राणे यांनी मनसे राज ठाकरे यांना लगावला आहे
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेतून रोजगार मेळाव्याच्या पाचवा टप्पा होता. या टप्प्यात ७१ हजार युवकांना नोकऱ्या मिळणार आहेत. या निमित्ताने नारायण राणे आज पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजेला आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटक निकालावरून भाजपवर राज ठाकरे यांनी टीका केली होती, यावरून नारायण राणे यांना वेळी प्रश्न विचारण्यात आला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असलेला निकाल आहे. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणामही दिसून आला. भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कोणी विचारत नाही. मोदी, शहा म्हणून त्यांचं अस्तित्व आहे’, अस म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. मात्र आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांचे एकूण किती आमदार, खासदार आहेत. महाराष्ट्रात अशा व्यक्तींनी भाष्य कारू नये. जिथे आमचे ३०२ खासदार आहेत देशात. महाराष्ट्र स्वतःचे १०५ आमदार आहेत. अधिक १२ आमदार आहेत. आणि याच्या एकवल्याने लोकप्रियतेची भाषा करावी आणि तुम्ही दाखवावं हे नेमकं कोणाचं दुर्दैवं? असं म्हणत नारायण राणेंनी टोला लगावला
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे इतर राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत, यावर नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला. सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना फार दुःख झालं आहे. यामुळे ते उद्धव ठाकरेंचं सांत्वन करायला आले. सत्तेतून खाली आहेत. फारच दुःखात आहेत ते. सहन होत नाहीए त्यांना मातोश्री. म्हणून हे मुख्यमंत्री आले. पण हे किती पक्ष आहेत (महाविकास आघाडी) सगळ्यांचे मिळून ६० ही खासदार होत नाहीत. मग अशा लोकांची गिणती काय कराची नाही. मराठीत एक म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या… यांना एकत्र केलं तरी चादर किंवा गोधडी होऊ शकत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.