• Mon. May 5th, 2025

भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली आणि…

Byjantaadmin

May 16, 2023

पुणे नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा थरारक अपघात घडला आहे. या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड धडकी भरवणारा आहे.  पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची मागची दोन्ही चाके निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. त्यानंतर बराच वेळ बस तीन चाकांवर धावत होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

नेमकं काय घडलं?

पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची (ST Bus) मागची दोन्ही चाके निखळली होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच तिरपी धावत गेली. या दरम्यान बसचा खालचा भाग घासत गेल्याने मोठ्या ठिणग्यादेखील उडाल्या. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीतला हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवला आहे.

परेल डेपोची बस क्रमांक MH20-BL 3618 बस परेल वरुन नारायणगावकडे निघाली होती. बसमध्ये जवळपास 35 प्रवासी होते. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. राज्य परिवहन महमंडळाची एसटी बसची चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *