• Mon. May 5th, 2025

 लातुर:गंजगोलाईतील अतिक्रमणे काढली

Byjantaadmin

May 16, 2023

लातुर:गंजगोलाईतील अतिक्रमणे काढली

लातुर(शहर प्रतिनिधी):- शहरातील गंजगोलाईतील अतिक्रमणे चार आठवड्यात हटविण्चाचे आदेश उच्च न्यालयाने दिले आहेत. या आदेशानूसार लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दि. १५ मे रोजी गंजगोलाईत कारवाई करीत अतिक्रमणे काढली. व्यापा-यांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. शहरातील गंजगोलाई व गंजगोलाईकडे येणारे सर्व रस्त्यांवर अतिक्रमण करुन व्यवसाय करणा-या व्यापा-यांचे अतिक्रमण काढण्याबाबत उच्च न्यावयालयाने दि. ३ मे २०२३ रोजीच्या झालेल्या आदेशाप्रमाणे दि. १५ मे रोजी गंजगोलाई भागातील अनाधिकृतपणे उभारलेली अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
गंजगोलाई भागातील रिलींगच्या आतील फळ विक्रेते, भाजीवाले, मज्जीद रोडवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. अतिक्रमणधारकांनी, व्यावसायीकांनी आपले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत अतिक्रमण काढले जा­ईल व साहित्य परत दिले जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. अनाधिकृत अतिक्रमण करण्या­त येणार नाहीत व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेवुन महानगरपालिकेस व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
गंजगोलाई येथील अतिक्रमणे अतिक्रमण विभाग प्रमुख रवि कांबळे, क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे, स्वच्छता निरीक्षक सिध्दाजी मोरे, महादेव फिस्के, रवि शेंडगे, सुनील कांबळे व मनपा कर्मचारी अतिक्रमण सा प्रमुख पांडुरंग सुळ, अजय घोडके, दत्ता पवार, निलेश शिंदे, मुस्तफा शेख, रज्जाक शेख यांच्या पथकाने काढले.
सुमारे ४० अतिक्रमणे काढली
गंजगोलाईत अतिक्रमणाविरोधी कारवाई केली जात आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून ही कारवाई केली जात आहे. याअंतर्गत मस्जिद रोडवरील ३० ते ३५ तर जुन्या कापड गल्लीतील ८ ते ९ अतिक्रमणे काढण्यात आली. टप-या, रस्त्यावरील कठडे तसेच रेलींगच्या आतील भाजीपाला, फळविक्रेत्यांना काढण्यात आल्याची माहिती मनपा अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख रवि कांबळे यांनी दिली. अतिक्रमण काढण्याची मोहीम कायमस्वरुपी सुरुच राहणार असून व्यवसायिकांनी कसल्याही प्रकारचे अतिक्रमण करु नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *