कर्नाटक विधानसभेच्या १३६ जागा जिंकत काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळाल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. सुशील कुमार शिंदे सध्या दिल्लीत पोहचले असून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचं भवितव्य ते ठरवणार आहेत.
तेथील तिढा सोडविण्यासाठी CONGRESS ने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. यामध्ये सरचिटणीस जितेंद्र सिंह, दीपक बाबारिया यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री SUSHILKUMAR SHIMNDE यांनी आपल्याला पक्षाने निरीक्षक म्हणून नेमल्याचे सांगितले आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे आता बंगळूरमध्ये ठाण मांडून असणार आहेत. रविवारी (ता. १४) ते ‘चार्टर प्लेन’ने सोलापुरातून बंगळूरला रवाना झाले.मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदार CONGRESS ने शिंदेंवर सोपविली असून त्यांच्या सोबतीला इतर दोन सहनिरीक्षक देखील आहेत. कर्नाटकात आता सत्तास्थापनेला वेग आला असून नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदेंची भूमिका निर्णायक असणार आहे.