• Mon. May 5th, 2025

कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळवून देणारे खर्गे अडचणीत! कोर्टाने पाठवलं समन्स

Byjantaadmin

May 15, 2023

कर्नाटकात बहुमत मिळवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या आनंदाच्या काळात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नव्या अडचणीत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान बजरंग दलाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून खर्गे यांना पंजाबमधील संगरूर जिल्हा न्यायालयाने समन्स पाठवले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीत बजरंग दलाच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात ही कारवाई झालीय.

KARNATAKA विधानसभा निवडणूकीत बजरंग दलाविरोधात अपमानजनक वक्तव्य आणि जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा या प्रकरणी बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी १०० कोटीचा मानहानी घटला दाखल केला आहे. सिव्हील जज सीनियर डिव्हीजन रमणदीप कौर यांच्या न्यायालयात  KHARGE यांना १० जुलै रोजी बोलवण्यात आले आहे.

हितेश भारद्वाज यांनी दावा केला आहे की, काँग्रेसने बजरंग दलाची तुलना देशविरोधी संघटनांसोबत केली आणि कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर बजरंग दलाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले.

कोर्टाने काय म्हटलंय?

या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने केस लिस्ट केली असून सिव्हील जज (सीनियर डिव्हीजन) रमणदीप कौर यांच्यासमोर मल्लिकार्जुन खर्गे यांची १० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

प्रकरण काय आहे?

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात सरकार निवडूण आल्यास राज्यात पीएफआय आणि बजरंग दल यांच्यावर बंदी घातली जाईल असे आश्वासन दिलं होतं. हा मुद्दा चांगलाच पेटला होता. भाजपने या प्रकणी काँग्रेसवर निशाणा साधला आणि या घोषणेला जोरदार विरोध करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी देकील प्रचारसभेत काँग्रेसवर हनुमानाचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *