केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मागील काही दिवसांपुर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे
दरम्यान छत्रपती संभाजी नगरमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्य CM SHINDE , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
तसेच पुण्यात Defence Institute of Advanced Technology चा 12वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावून त्याच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.