भाजपा युवा मोर्चाने केला अरविंद पाटील निलंगेकर यांचा जंगी सत्कार
क्रेनने हार घालून आनोखे स्वागत…
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा मतदार संघातील निलंगा व देवणी बाजार समितीच्या निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळाला होता.या विजयाचे शिल्पकार मॕनेजमेन्ट गुरू अरविंद पाटील निलंगेकर यांचे शहरात आगमन होताच छञपती शिवाजी महाराज चौकात क्रेनच्या सहाय्याने तीनशे किलोचा हार घालत जंगी स्वागत केले….
निलंगा मतदार संघातील निलंगा औराद शाहजानी,देवणी, येथील बाजार समिती निवडणूकीत निलंग्यात व औराद शाहजानीत १८ पैकी १८ आणि देवणीत १८ पैकी १६ जागा निवडून आणत अरविंद पाटील निलंगेकर परीवर्तन पॕनलचा मोठा विजय झाला आहे.तिन्ही बाजार समितीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मॕनेजमेन्ट गुरू अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात चालू असून आपला गढ भाजपा पक्षाच्या मागे असल्याचे निलंगेकर यानी दाखवून दिले आहे.या अनुशंगाने निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ येथील युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी अरविंद पाटील निलंगेकर यांचा क्रेनच्या सहाय्याने तीनशे किलोचा हार घालत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत फुलांची उधळन केली व छञपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची अतिषबाजी करत जंगी स्वागत केले.तसेच छञपती शिवाजी महाराज याना पुष्प अर्पण करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली या मिरवणूकीत युवा मोर्चाचे सर्व पदाधिरी कार्यकर्ते व बाजार समितीचे सर्व नुतन संचालक मंडळ उपस्थित होते.