लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण- टी १० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
तरुणाई पुन्हा मैदानावर दिसणार क्रिकेट प्रेमींना मेजवानी
आमदार धिरज देशमुख यांचा पुढाकार
लातूर:-‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण- टी १०’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील क्रिकेट संघांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप संयोजन समितीच्या वतीने व लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही स्पर्धा १९ ते २२ मे या कालावधीत होणार आहे. तालुका स्तरावरील या स्पर्धेत प्रथम आलेल्या संघांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार असून ही स्पर्धा २३ ते २५ मे या कालावधीत जिल्हास्तरावर होणार आहे.
लातूर शहरातील स्पर्धा बसस्थानक क्र. २, अंबाजोगाई रस्ता येथे तर लातूर ग्रामीणची स्पर्धा बाभळगाव येथील दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणावर होईल. रेणापूर येथील स्पर्धा एमएसईबी समोरील अकनगीरे यांचे मैदान, औसा येथील स्पर्धा उटगे मैदान, निलंगा येथील स्पर्धा शिवाजी विद्यालय प्रांगण, देवणी येथील स्पर्धा एमएसईबी मागील मैदान, शिरुर अनंतपाळ येथील स्पर्धा साई मंगल कार्यालयाशेजारील मैदान, जळकोट येथील स्पर्धा पोलीस वसाहत कुनकी रस्त्यावरील मैदान, उदगीर, अहमदपूर आणि चाकुर येथील स्पर्धा तेथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर होणार आहे.
ही स्पर्धा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, जागृती शुगर अँड अलाईज इंडस्ट्रीज, ट्वेन्टी वन शुगर्स यांच्या सौजन्याने होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना ५०१ रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार असून नोंदणीला सुरवात झाली आहे. इच्छुक संघांनी पुढील ठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*या ठिकाणीं संघांनी नोंदणी करावी*
लातूर ग्रामीण : दयानंद विद्यालय, व्यंकटेश हॉस्पिटल मुरुड, विलास साखर कारखाना गट कार्यालय मु. अकोला, बोरगाव काळे, कासारजवळा, महमदापूर, काटगाव, तांदुळजा, लातूर शहर : काँग्रेस भवन, अप्पा पान स्टॉल शिवाजी चौक, जे जे पान स्टॉल शिवाजी चौक, मिलन कलर कॉन्ट्रॅक्टर – खडक हनुमान, रेणापूर : विवेकानंद अकॅडमी, औसा : श्री व्यंकटेश एमआरएफ टायर हाश्मी चौक, वेदिका डिजिटल, श्रद्धा किराणा अँड जनरल स्टोअर्स, देशमुख टूर्स अँड ट्रॅव्हल शिंदाळा, निलंगा : काँगेस पक्ष कार्यालय, देवणी : शेषनाथ ट्रेडर्स, जगताप आडत दुकान, सायली हॉटेल, शिरूर अनंतपाळ : शिवनेरी विद्यालय, जळकोट : काँग्रेस संपर्क कार्यालय, महेश भांडी स्टोअर्स, अहमदपूर: साई शिव भोजनालय, दत्तात्रेय प्रिंटिंग प्रेस, प्रकाश भोजनालय, चाकुर : गोविंदा मोबाईल, स्वागत टेलर, अष्टविनायक मेडिकल (नळेगाव), उदगीर : कॅप्टन कृष्णकांत चौक, नैवेद्यम हॉटेल उदगीर या ठिकाणी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.