पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.आतापर्यंच्या तपासात कुरुलकर हे हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवले गेल्याचं आढळून आलं होतं. पण जसजसा तपास पुढे सुरु झाला त्यातून ते जाणीवपुर्वक या सर्वांत सहभागी झाल्याचं आढळून आलं आहे.
न्यायालयाने कुरुलकर यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला असून कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती पुरवण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडी’चा वापर करायचे. डीआरडीओ च्या गेस्ट हाऊस मध्येही काही महिलांना कुरुलकर भेटले होते. या महिला कोण होत्या, त्यांना त्यांनी कोणती माहिती दिली. तपासातून समोर आली आली आहे.
याशिवाय कुरुलकरांचा फोटो, व्हिडीओ आणि काही गोपनीय फाईल्स देखील पाकिस्तानला पुरवल्याचे एटीएसच्या तपासातून निष्पण्ण झाले आहे. कुरुलकर या ईमेलद्वारे ज्यांच्याशी संपर्कात होते ते सर्व पाकिस्तानातील होते. तसेच, सोशल मिडीयातून फाईल्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर झाले आहेत. कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टच्या वापर करुन त्यांनी सहा वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्याचे तपासात आढळून आले आहेत. या भेटीत कुरुलकर कोणाला भेटले, त्यांनी काय काय माहिती पुरवली, या दृष्टीने आता पुढील तपास करण्यात येणार आहेत.