सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांच्या निलंबनाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, ते १६ आमदार अपात्र झाले तर सरकार कसे स्थिर राहील? असा प्रश्न विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी करताना शिंदे व फडणीस सरकारवर टांगती तलवार असल्याचा दावा केला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना विश्वासात घेऊन राजीनामा दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते असा दावा देखील त्यांनी केला.
श्री. झिरवाळ म्हणाले की, तूर्त मुख्यमंत्रीeknath shinde यांचे सरकार बचावले असते तरी सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय अद्याप बाकी आहे. ते सोळा आमदार अपात्र झाल्यास सरकार स्थिर राहणार नाही.
भरत गोगावले यांची नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरविताना अपात्रतेचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. udhav thakre यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचलं असते. आता सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्याशिवाय प्रक्रिया होणार नाही असे श्री झिरवाळ म्हणाले.