लैंगिक छळ केल्याच्या आरोपाने वेढलेल्या BJP MP ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढ झाली आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने दिलेल्या जबाबात धक्कादाक माहिती दिली आहे. पोलीस आत अन्य कुस्तीपटूंचे देखील जबाब नोंदवणार आहेत. एनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे
अल्पवयीन महिला कुस्तीपटूने फेडरेशनच्या प्रमुख आणि भाजपचे खासदार यांच्यावरील लैंगिक छळाशी संबंधित आरोपांविषयी आपला जबाब नोंदवला आहे. सीआरपीसीच्या कलम १६४ अन्वये महिला कुस्तीपटूचे जबाब नोंदवला.या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी BJP MP ब्रिजभूषण सिंह यांच्यावर यापूर्वीच दोन एफआयर दाखले केले होते. दरम्यान या प्रकरणात खटला चालवला जाणार आहे. पोलीस पीडितांचे जबाब नोंदवून घेणार आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
अल्पवयीन महिला कुस्तीपटूंशी लैंगिक छळ केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यात पॉक्सो कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या एफआयआर लैंगिक छळाच्या आरोपाखाली दाखल केले गेले आहे.BJP MP ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी विनेश फोगाट, साक्षी मलिका आणि बजरंग पोनिया यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत.या कुस्तीपटूंनाही शेतकर्यांकडून पाठिंबा मिळत आहे. या व्यतिरिक्त, अनेक राजकीय पक्षांनी जंतर-मंतर भेट देऊन कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविला आहे.
पोलिसांकडून मागितला अहवाल –
बुधवारी रौसे एव्हेन्यू कोर्टाने बुधवारी ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध नोंदविलेल्या तक्रारींबाबत दिल्ली पोलिसांकडून लैंगिक छळाच्या आरोपाखाली स्टेटस रिपोर्ट मागितला होता.अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी हारजितसिंह जसपाल यांच्या कोर्टाने कुस्तीपटूंच्या याचिकेवर पोलिसांना नोटीस बजावली आहे