राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. आजच्या निकालात देखील उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा टर्निंग पॉइंट ठरला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सूनावणीतील अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याव रउध्दव ठाकरे नी त्यावेळी राजीनामा का दिला याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आणता आले असते, असं सुप्रीम कोर्टाने आजचा निर्णय देताना म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं कि, कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला हे चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असं ठाकरे म्हणालेत.
तर मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाही. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला होता, ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणता आलं असतं, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या सुनावणी वेळी केलं.उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हंटलं आहे. उध्दव ठाकरेनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सरकारला कोणताही धोका नाही, असं सांगण्यात येत आहे.