• Sun. May 4th, 2025

लिंगायत महासंघाचा जयंती समारोप कार्यक्रम

Byjantaadmin

May 11, 2023

लिंगायत महासंघाचा जयंती समारोप कार्यक्रम
महात्मा बसवेश्‍वर जयंतीसाठी पुढीलवर्षी 200 वक्ते तयार करणार-प्रा.सुदर्शनराव बिरादार
लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने 22 एप्रिल 2023 या महात्मा बसवेश्‍वर जयंतीपासून सुरू असलेला जयंती पंधरवाड्याचा समारोप कार्यक्रम दि.10 मे 2023 रोजी भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी बोलताना प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले पुढच्यावर्षीपासून महात्मा बसवेश्‍वर जयंती पंधरवाडा आयोजित करू व जयंतीसाठी भासत असलेल्या वक्त्याची उणीव 200 वक्ते तयार करून ती पुर्ण करू. ते पुढे म्हणाले की, 90 किलोमिटरवर असलेले महात्मा बसवेश्‍वरांचे कार्यस्थळ व कार्य समजण्यासाठी समाजाला 900 वर्षे लागले. महात्मा बसवेश्‍वरांच्या विचाराचा प्रसार व्हावा तसा झाला नाही. हे समतेचे तत्वज्ञान समाजाला कळाले पाहिजे त्यासाठी जोराचे प्रयत्न झाले पाहिजेत. आता नवीन पिढी समोर येत आहे. इंटरनेटचा जमाना आहे. या काळात सर्वांना हातात माहिती मिळत आहे. त्या माध्यमातून महात्मा बसवेश्‍वरांची माहिती समाजाला कळाली पाहिजे यासाठी खास यंत्रणा निर्माण करावी लागेल. या नवतरूणांना याविषयाची गोडी लागली पाहिजे असे ते म्हणाले. आगामी काळात महात्मा बसवेश्‍वर हेच मानवतावाद्याची जागतीक ओळख असेल. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्व पातळीवर व सर्व माध्यमातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. महात्मा बसवेश्‍वर जगाला कळाले तर जग हे महात्मा बसवेश्‍वरांना नं.1 चे तत्वज्ञानी म्हणून मानतील. त्यांच्या विचाराचा प्रचार व अनुकरण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तसेच समाजातील कालबाह्य गोष्टीची समाजाला गरज आहे का? याचे चिंतन-मंथन होणे गरजेचे आहे. याप्रसंगी भिमाशंकर ढेकणे यांची लिंगायत महासंघाच्या लातूर तालुकाध्यक्षपदी तसेच लातूर तालुका उपाध्यक्षपदी विजयमुर्ती बिडवे व शहर उपाध्यक्षपदी प्रा.विठ्ठल आवाडे यांची निवड प्रा.सुदर्शन बिरादार यांनी जाहीर केली. यावेळी अ‍ॅड.मल्लिकार्जुन करडखेलकर, ओमप्रकाश आर्य, प्रा.एम.बी.पठाण, रामराजे आत्राम, सुभाष शंकरे, अ‍ॅड.मधुकर राजमाने यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात समग्र महात्मा बसवेश्‍वर या ग्रंथाचे उपस्थित सर्व समाजबांधवांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लिंगायत महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथअप्पा भुरके, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, तालुकाध्यक्ष भिमाशंकर ढेकणे, शहराध्यक्ष प्रा.वैजनाथ मलशेट्टे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे व कार्याध्यक्ष धिरज माकणे, जिल्हा मार्गदर्शक सिद्रामप्पा पोपडे, जी.जी.ब्रम्हवाले, विश्‍वनाथ मिटकरी, जिल्हा कोषाध्यक्ष माणिकप्पा मरळे, शहर उपाध्यक्ष प्रा.विठ्ठल आवाळे, सौ.आवाळे ताई व तालुका उपाध्यक्ष विजयमुर्ती बिडवे, लिंगायत महासंघाचे शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार, बलराज खंडोमलके, चंद्रकांत तोळमोरे, दैठणकर सर, विश्‍वनाथ ढोले, मनोज राघव, रमेश वेरूळे, विश्‍वनाथ होळकुंदे यांच्यासह अनेक साहित्यीक, समाजबांधव व पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वैजनाथ मलशेट्टे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.विठ्ठल आवाळे यांनी केले तर आभार जी.जी.ब्रम्हवाले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *