महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याचे विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत.
गेल्या 11 महिन्यांपासून देशाचे लक्ष लागून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.फडणवीस म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही पूर्णपणे समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा पूर्णपणे विजय झाला आहे. असं मी नमूद करतो. या निकालातील पाच ते सहा मुद्यांकडे लक्ष वेदतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे MVA वर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. न्यायालयाने स्पष्टच सांगितलं की टेटस्को करता येणार नाही. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
“दुसरं त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की, आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. विधानसभा अध्यक्ष हे या अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेतील. त्यामुळे या प्रकरणामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे, हे स्पष्ट होत आहे. ज्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे, त्यांना सर्व अधिकार असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे”, असंही फडणवीस म्हणाले.