• Sun. May 4th, 2025

काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुमची ‘नरहरी झिरवळ’,

Byjantaadmin

May 11, 2023

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज  सत्ता संघर्ष निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्वच राज्याचं लक्ष लागलं आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *