विलासराव देशमुख मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार
एकुण १५ मीटर रुंद चारपदरी रस्ता; पब्लिक प्लाझा; वॉकींग आणि सायकल ट्रॅक
लातुर:-शहरातील जुने रेल्वे लाईनवरील विलासराव देशमुख मार्गाचे काम काहीं दिवसांपासून सुरु झाले आहे़ १४.४५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेला हा मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार आहे़ एकुण १५ मीटर रुंद चारपदरी रस्ता, पब्लिक प्लाझा, वॉकींग, सायकल ट्रॅक, सीटी बसस्थानक, अशा विविध सुविधा असणार आहेत़ वेगाने विकसीत होत असलेल्या लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्ग शहराच्या प्रगतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा ठरणार हे निश्चित़ लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील जुन रेल्वे लाईनच्या रस्त्याला विलासराव देशमुख मार्ग असे नाव दिले़ त्यानंतर या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली़ विलासराव देशमुख मार्ग म्हणजे लातूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुवीधानीयुक्त पथदर्शी प्रकल्प असल्यामुळे हा मार्ग महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेतून लातूर शहरातील अत्यंत महत्वाचा असलेला विलासराव देशमुख मार्ग नव्याने बांधण्यात येत आहे.
लातूर शहरातील वाढती रहदारी आणि त्यामूळे मुख्यमार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी हा पर्यायी मार्ग नव्याने बांधण्याचा निर्णय तत्कालीन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेऊन त्यातील मिनी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास १४.४५ कोटींचा निधी मंजूर केला होता. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा वेगळा आणि दर्जेदार तयार करण्याचे नियोजन करुन त्याचे काम श्री मारवाडी राजस्थान विद्यालयापासून सुरु करण्यात आले आहे़.
महाराष्ट्रातील एक पथदर्शी मार्ग म्हणून नावारुपाला यावा अशी माजी मंत्री आमदार आमदार अमित देशमुख यांची संकल्पना आहे. सदरील रस्ता एकूण १५ मीटर रूंद चारपदरी रस्ता आहे, रस्त्याच्या दक्षीणेला पब्लीक प्लाजा असून या ठिकाणी वाचनकट्टे, वायफाय, विश्राती थांबे व खादय पदार्थाची सोय आदी सुविधा होणार आहेत. वयोवृध्दासाठी, लहानमुलांसाठी या ठिकाणी अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. रस्त्याच्या उत्तर बाजूस वॉकीग आणि सायकल ट्रॅकची उभारणी होणार आहे, या मार्गावर बस आणि रिक्षा स्टॅड उभारणी तसेच स्वतंत्र पार्कीगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे, या मार्गावर प्रभावी सिग्नल यंत्रणा उभारली जाईल, या ठिकाणची ड्रेनेज व विजवाहीन्याची व्यवस्था जमीनीखालून असेल, त्याच बरोबर रस्त्याच्या कडेला व दुभाजकात आकर्षक वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पॅटर्न असलेल्या लातूर शहराची वाढ आणि पर्यायाने वाढत्या वाहन संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता दिर्घकालीन उपाय म्हणून विलासराव देशमुख मार्ग हा लक्षवेधी ठरणार आहे. या महामार्गासाठी अमेरिकेतील नांमाकीत वास्तूविशारद तज्ञ कुशल लचवनी यांच्या संकल्पनेतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. याकरीता आवश्यक डीजाईन तसेच इतर पायाभूत सुविधा या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून शासन व प्रशासन यांच्या सोबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नियोजनपूर्वक घेण्यात आलेल्या बैठकांच्या माध्यमातून विलासराव देशमुख मार्गाचे अंतिम स्वरूप निश्चीत करण्यात आले आहे. या रस्तासाठी १४.४५ कोटी रूपये निधी उपलब्धता करून देण्यात आला असून या मार्गाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे विशेष लक्ष
लातूर शहरातील मुख्यमार्गाला पर्यायी रस्ता म्हणून बांधण्यात येत असलेल्या विलासराव देशमुख मार्गाच्या कामावर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे विशेष लक्ष आहे़ त्यांनी वारंवार या मार्गाची पाहणी करुन हा मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोयीसुवीधानीयुक्त पथदर्शी प्रकल्प असल्यामुळे या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधीत कंत्राटदारास वारंवार सुचना दिल्या आहेत़ दि़ १६ ऑगस्ट २०२२ रोजीही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या मार्गास भेट देऊन पाहणी केली होती़.
चौकट
विलासराव देशमुख मार्गाची काही वैशिष्ट्ये
* एकूण १५ मीटर रूंद चारपदरी रस्ता
* रस्त्याच्या दक्षिणेला पब्लीक प्लाझा
* रस्त्याच्या उत्तर बाजूस वॉकींग आणि सायकल ट्रॅक
* बस आणि रिक्षा स्टॅडची उभारणी
* पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था
* मार्ग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली
* प्रभावी सिग्नल यंत्रणेची उभारणी
* वाचनकट्टे, वायफाय, विश्रांती थांबे व खादय पदार्थाची सोय होणार
* ड्रेनेज व विजवाहिन्याची जमीनीखालून व्यवस्था
* रस्त्याच्या कडेला व दुभाजकात आकर्षक वृक्षांची लागवड