भुकंप भयग्रस्तांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
शासनाने पुनर्वसनाचा निर्णय ताबडतोब घ्यावा
अन्यथा लोकप्रतिनिधीना धडा शिकवू. उमाकांत उफाडे
निलंगा / प्रतिनिधी:-शासनाने हासोरी मदनसुरी परिसरातील भुकंप प्रवन क्षेत्रातीलच चाळीस गावातील भयग्रस्त नागरिकांना ताबडतोब पक्का निवारा आणि सुव्यवस्थित पुनर्वसनाचा निर्णय ताबडतोब घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड भर दिवाळीत भुकंपग्रस्त नागरिकांना आमदार लोकप्रतिनिधींच्या घरात घुसुन धडा शिकवेल असा इशारा देन्यात आला.
तालुक्यातील हासोरी ,मदनसुरी परिसरातील चाळीस गावात गेले दोन महिन्यापासून भूकंपाच्या तिव्र धक्क्यामुळे सुमारे चाळीस गावातील नागरिक भयग्रस्त झाले असुन कधी घर आपल्या डोक्यावर कोसळून मनुष्यहानी याचा नेम नाही तेव्हा पासुन मृत्यूच्या छायेखालील भितीग्रस्तानी शासनास कळऊनह तात्पुरत्या निवासस्थानाचा प्रश्न सुटत नाही हे पाहुन नागरीक गेले दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्यास संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठींबा देन्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे. लातूर महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. जिल्हा सचिव रफिक शेख.निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम. यांनी प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली उपोषणास सहभाग घेतला . भयग्रस्ताना धीर दिला आणि शासनाने गंभीरतेने दखल घेऊन नागरिकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसनार नाही आणि उपोषणही सुटनार नाही असा इशारा निलंगा तहसीलदार यांना संभाजी ब्रिगेड तर्फे निवेदन देऊन शासनास यावेळी देण्यात आला.