• Sat. May 3rd, 2025

चांगले, वाईट धंदे करणाऱ्या स्वयंसेवकांवर संघाने नजर ठेवावी!

Byjantaadmin

May 9, 2023

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदिप कुरुलकर यांना तपास यंत्रणांनी पाकीस्तानला गोपनिय माहिती पुरविल्याने अटक केली. या प्रकरणात संघावर कोणी राष्ट्रद्रोहाचा आरोप करू शकणार नाही. मात्र संघात राहून चांगले वाईट धंदे करणारे लोक आहेत. त्यांच्यावर संघाने नजर ठेवली पाहिजे, असे अशी अपेक्षा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळयांना भाजपकडूनकेरळ फाईल्स चित्रपटाचा प्रचार होत आहे. तसेच डीआरडीओ संस्थेची गोपनिय माहिती शत्रुराष्ट्र पाकीस्तानला पुरविल्याने तेथील उच्चपदस्थ प्रदिप कुरुलकर यांना अटक झाली आहे. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे चांगले-वाईट काम करणाऱ्या आपल्या स्वयंसेवकांवर संघाने (RSS) लक्ष ठेवले पाहिजे.

 

या संदर्भात छगन भुजबळ म्हणाले, या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणीही राष्ट्रद्रोहाचा आरोप करू शकत नाही. मात्र `आरएसएस` मध्ये आहे असे सांगून जे काही चांगले वाईट धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्यावर संघाने नजर ठेवली पाहिजे. पोलिस आणि तपास यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोणीही असे हनी ट्रॅपमध्ये अडकवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कोणी सापडले तर त्यांना ताबडतोब दूर केले पाहिजे. देशाला धोका देणारे कोणत्याही संघटनेचे, पक्षाचे असतील तरी त्यांना कडक शिक्षा द्यायलाच पाहिजे.

केरळ फाईल्स दुर्दैवी

केरळ फाईल्स चित्रपटाचे खास शो भाजपचे लोक दाखवत आहेत, त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला नक्की माहित नाही, मात्र केरळच्या तीन हजार की काही तरी महिला गायब झाल्या असे काही तरी त्यात दाखवले आहे. नंतर कळले तीन हजार नव्हे तीन मुली फक्त आहेत. त्यात पुन्हा आज महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले की फार राज्यातून बावीसशे महिला, मुली गायब आहेत.

हा सगळ्यांचाच चिंतेचा विषय आहे. मात्र त्यात राजकीय हेतुने केवळ हिंदू-मुसलमान असे चित्र निर्माण करायचे हे काही बरोबर नाही. केरळ फाईल्स फक्त केरळमध्ये नाही सबंध देशभर दिसेल. त्याचा अर्थ एखादे राज्य, धर्म याविषयी द्वेष पसरवणे असा होत नाही. तो प्रश्न समजुन घ्यावा लागेल.

ते म्हणाले, एकंदर धर्मा धर्मामध्ये भांडण लावायचे आणि त्यानंतर त्याचा फायदा आपल्याला निवडणुकीत होईल असा विचार करायचा हे कोणासाठीच हितावह नाही. कोणी तसले चित्रपट दाखवू नये. दाखवले तर लोकांनी गांभिर्याने किंवा मनावर घेऊ नये. सध्या शाहीर साबळे यांच्यावरील महाराष्ट्र शाहीरी चित्रपट आहे, त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली. तो का नाही दाखवत फुकट असा प्रश्न भुजबळ यांनी केला.

काही लोक अशी खोटी माहिती पसरवतात. हे आमचे दुर्दैव आहे, की अशा बोगस लोकांच्या मागे लक्षावधी लोक जात आहेत. अंधश्रद्धेला बळ देण्याचे काम करीत आहेत. असे झाले तर मग राज्यकर्त्यांच्या चुका त्या देखील लपल्या जातात. त्यावरील लक्ष विचलीत करण्याचे काम देखील हे बोगस लोक करत असतात.

ज्यांना स्वतःचे भविष्य माहिती नाही, ते काय देशाचे भविष्य सांगणार?. ही सोपी गोष्ट आहे का?.. २२ कोटी जर मुस्लीम समाज असेल, इतर समाज असतील, दोन चार लोकांचे काही झाले तरी लगेच अमेरिका व जगाच्या अन्य भागात ओरड सुरु होते.

ते पुढे म्हणाले, आज आपण कोणत्या जगामध्ये आहात?. दोन चार सेकंदामध्ये इथली माहिती अमेरिकेला कळते. अशा स्थितीत जे काही संत असतील, त्यांनी संतासारखे वागावे. संतांचे काम करावे. त्यांनी अशा गोष्टी सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. ते सांगतात, म्हणून त्यावर विश्वास ठेवण्याची देखील आवश्यकता नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील मशीदीमध्ये जात आहेत. अन्य एक नेते गेले, त्यांनी मुस्लीम समाजाला समानतेची गरज असल्याचे ते म्हणाले. ते काही तरी अभ्यास करून बोलताहेत ना?.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *