कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप-काँग्रेसकडून या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने एक घोषणापत्र जारी केले होते. यामध्ये कर्नाटकात जर काँग्रेसचे सरकार आले तर ‘बजरंग दल’वर बंदी घालण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.
रचारादरम्यान काँग्रेसने ‘बजरंग दला’वरही जोरदार टीका केली होती. यानंतर भाजपने आणि ‘बजरंग दला’ने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये तणावाचे वातावर निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच अहमदनगरमधील काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
karnatak मध्ये तणावाचे वातावर निर्माण झाल्यानेbjp प्रणित संघटनांच्यावतीने गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली पोलिसांनी शहर काँग्रेसच्या चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयावरpoliceचा बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान,ahmadnagar शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनीcongress कार्यालयास भेट देऊन समक्ष पाहणी केली आहे. दरम्यान, कुणी आमच्या अंगावर आल्यास त्यांना शिंगावर घेऊ, असा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे.