• Sat. May 3rd, 2025

नागरी समस्या सोडवा, शिवसेनेचे नव्या आयुक्तांना साकडे

Byjantaadmin

May 9, 2023

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासक पदी नुकतीच जी. श्रीकांत (Municipal Administrator ) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कामाला सुरूवात केली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नव्या प्रशासकांची भेट घेतली.

या भेटीत शहरातील खड्डे व इतर मुलभूत पायासुविधांचे प्रश्न तातडीने सोडवा, असे साकडे जी. श्रीकांत यांना घालण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून शहरात प्रशासकांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाच भेटावे लागते.

रस्ते, खड्डे, पाणी यासह अनेक मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व मागण्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला देत आहोत. आपण शहरातील मूलभूत नागरी समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी chandrakant kaire  यांनी यावेळी केली.

जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले तेव्हा जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, बसवेश्वर पुतळा, महाराणा पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, घरकुल योजना.

तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक नूतनीकरण, संत तुकाराम महाराज नाट्यगृह सुशोभिकरण, मार्केट कमिटी, व्यापारी महासंघ यांच्या समस्या, सफारी पार्क, स्मार्ट सिटी, सिमेंट रोड, नोकरभरती, महिला शौचालय, खड्डे, पाणीपुरवठा, पथदिवे आदी समस्यावर चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत, यामुळे छोटे-मोठे अपघात दररोज होतात, त्यामुळे ते तातडीने बुजवावेत, असेही खैरे यांनी भेटीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *