औशातील ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने २५ जोडपे होणार विवाहबद्ध !सामुदायिक विवाह सोहळ्यातच आमदारांचे चिरंजीव होणार विवाहबद्ध.
औसा – लातूर जिल्ह्य़ातील इतिहासात पहिल्यांदाच सामुदायिक विवाह सोहळ्यात आमदारांचे चिरंजीव विवाहबद्ध होणार असून या ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेसह केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, तसेच आध्यात्मिक गुरू उपस्थित राहणार आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या वतीने १० मे रोजी औसा येथे आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी,शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील मुला – मुलींचे विवाह लावून आ. अभिमन्यू पवार मुलींचे कन्यादान करणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्यभरातून लोक सहभागी होणार असून यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे.
१० मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटाला औसा येथील उटगे मैदानावर या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल कुटुंबातील २५ जोडप्यांच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यातच आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार व डॉ उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ चैताली उदय मोहिते पाटील विवाहबद्ध होणार आहेत. यासाठी औसा येथे मोठय़ा प्रमाणात आवश्यक ती तयारी केली जात असून या ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, हभप गुरुबाबा महाराज औसेकर, खासदार जयसिध्देश्वर महाराज, एन बी रेड्डी गुरुजी बिदर, बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी भालकी, संगन बसव स्वामीजी निलंगा, श्री श्री 108 गंगाधरलिंग शिवाचार्य महाराज हुमनाबाद,1008 श्री वीर रेणुक गंगाधर शिवाचार्य हीरेमठ समस्ताना हुमनाबाद, मनिप्र श्रीगुरु कोरणेश्वर महास्वामी तसेच केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार मुलींचे कन्यादान करणार असून पिता एका मुलीच्या लग्नात करतो आशा सर्व गोष्टी व संसारोपयोगी वस्तू देणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर आकर्षक प्रवेशद्वार, विदयुत रोषणाई, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्या त्या मार्गावर पार्किंग व्यवस्था, या विवाह सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून हजारो लोक येणार असल्याने त्या अनुषंगाने मंडप उभारण्यात येत आहे.विवाह सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला मंडपात संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून हा विवाह सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक तिथे बाॅरिकेट लावण्यात आले आहेत. हा सोहळा सुनियोजितपणे पार पडण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्तेसह जिल्हा प्रशासनासोबत बैठका घेऊन योग्य ते नियोजन केले आहे.
या विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांचा समुदाय पाहाता भोजन व्यवस्था दुपारी १ वाजेपासून सुरू होणार असून भोजन व्यवस्थेसाठी मतदारसंघातील प्रत्येक गावातून शेकडो स्वयंसेवक पुढाकार घेणार आहेत. लातूर जिल्ह्य़ातील इतिहासात आतापर्यंत असा देखणा सामुदायिक विवाह सोहळा पहिल्यांदाच होत असून सामुदायिक विवाह सोहळ्यात आमदारांचे चिरंजीव विवाहबद्ध होण्याची हि पहिलीच घटना असावी….