लोटांगण घालून झाड तोडणाऱ्याचा निषेध व झाडे तोडू नका ही विनंती.
लातुर:-शहरात झाडे लावण्यापेक्षा झाडे तोडण्याचा वेग अधिक आहे असे जाणवत आहे. कोणतेही कारण नसताना ठिकठिकाणी पूर्ण वाढ झालेली झाडे तोडली जात आहेत. असाच प्रकार दयानंद महाविद्यालय समोर घडला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमने लावलेले व मोठे पूर्ण वाढ झालेले झाड अज्ञात व्यक्तीने मध्यभागातून तोडले. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन झाडाला दंडवत घालून झाड तोडणाऱ्या व्यक्तीचा निषेध केला.झाडाला व्यवस्थित करून नवीन संरक्षक जाळी बसवून झाड सुरक्षित केले.
महानगरपालिका प्रशासनाने आज पर्यत वृक्ष तोड करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही, किंवा त्याचा पाठपुरावा केला नाही, महानगरपालिका पाठपुरावा करत नसल्याने स्थानिक पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करून घेत नाही. त्यामुळे वृक्ष तोंड प्रमाण वाढले आहे. लातूर जिल्ह्यातील वृक्ष आच्छादन महाराष्ट्रात सर्वात कमी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन करणे गरजेचे आहे, वृक्ष तोड बंदी आवश्यक आहे असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य बाळासाहेब बावणे यांनी केले आहे.