• Thu. May 1st, 2025

जाधव एम. एम. यांचा 50 वा वाढदिवस, गोरगरीब मुलांना आर्थिक मदत देऊन साजरा

Byjantaadmin

May 7, 2023

जाधव एम एम यांचा 50 वा वाढदिवस, गोरगरीब मुलांना आर्थिक मदत देऊन साजरा

निलंगा तालुक्यातील बामणी या गावचे सुपुत्र जे नेहमीच सामाजिक, राष्ट्रीय व शैक्षणिक कार्यात सक्रीय असतात ते जाधव एम एम यांचा50वा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस व त्यांच्या लग्नाचा27वा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जिजाऊ सृष्टी निलंगा येथे 5 मे रोजी सायंकाळी त्यांच्या मित्रपरिवाराने अतिशय उत्साहात साजरा केला.या निमित्ताने मराठा समाज संघ विध्यार्थी प्रतिष्ठान लातूर हे गोरगरीब व अनाथ मुलांच्या उच्च शिक्षण यावर काम करते. दरवर्षी एका व्यक्तीकडून 12 हजार रुपये मदत घेऊन ते गरजूंना मदत करतात. गेल्यावर्षी पासून जाधव एम एम याचे सदस्य म्हणून मदत करतात याही वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक उदय पाटील,सचिव डॉक्टर सुधीर मुगळे, उपाध्यक्ष अमित पाटील यांना चेक देण्यात आला व ही मदत हयात असेपर्यंत करणार असल्याचा संकल्प जाधव एम एम व त्यांच्या पत्नी रंजना जाधव यांनी केला आहे. तसेच गरीब मूलिंच्या वसतिगृहासाठी दोनवर्षापासून वर्षाला25 हजार रुपये मराठा सेवा संघ लातूरला देतात.एक लक्ष रुपयांपर्यंत मदत करन्याचा संकल्प केला आहे. मागे आनंदवाडी गौर येथे मराठा सेवा संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने श्रमदान ,ननंद येथे जलस्वराज्य अभियान साठी श्रमदान, गोरगरीब विध्यार्थी यांना वह्या वाटप, कोरोनाकालावधित अन्नदान असे दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी वाढदिवस साजरा करतात. सुरवातीला जिजाऊ पूजन आई प्रभावती व वडील माधवराव यांच्या हस्ते करण्यात आले. जिजाऊ वंदनेने अमर पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य दिलीपराव धुमाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदय पाटील उद्योजक, आप्पाराव शिंदे जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ, नवघरे संभाजी राष्ट्रीय अध्यक्ष संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष धनंजय उज्जनकार राज्यकार्याध्यक्ष पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, बोराडे ताई जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षहे होते. पारंपरिक पद्धतीने आई व बहीण यांनी औक्षण करून व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांभारगे व्ही एम यांनी केले.सूत्रसंचालन सतिश हानेगावे यांनी केले तर यावेळी जाधव ए पी,गुंडुरे डी बी,बरमदे डी बी,मुळे सुनील, प्रल्हाद बाहेती,विवेक सौताडेकर, अरुण सोळुंके, उदय पाटील,आप्पाराव शिंदे,बालाजी जाधव,बोराडे ताई यांनी मनोगत व्यक्त केले तर सत्काराला जाधव एम एम यांनी उत्तर दिले व कायम सामाजिक बांधीलकी जपणार असे सांगितले.अध्यक्षीय समारोप दिलीपराव धुमाळ यांनी केला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जाधव आनंद,बिरादार दत्ता, बाबलसुरे डी डी,सगरे पी एस,मोरे अजय,हिरास सत्यजित, किरण धुमाळ,अर्जुन जाधव,उकरंडे शामराव,विठ्ठल जाधव, इंजि घोरपडे मोहन,विनोद सोनवणे, धुमाळ डी एस,बरमदे डी एन, संदीप खमीतकर,बरमदे आर एन,डॉक्टर शिंदे एस एस,डॉक्टर उद्धवराव जाधव यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *