न्या. ए. वाय. सय्यद यांचा विशेष गौरव
लातूर : येथील रहिवाशी तथा मुबंई उच्च न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी ए. वाय. सय्यद यांच्या न्यायालयीन कार्याबद्दल तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वतीने कौटुंबिक व आर्थिक प्रकरणामध्ये तडजोडी करून ५७८ प्रकरणे निकाली काढल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. के. तोतला यांच्या हस्ते न्या. ए. वाय. सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात आला.