महाराष्ट्र महाविद्यालयातील सात विद्यार्थी जेईई अडव्हान्स् परीक्षेस पात्र
जेईई परीक्षेत निलंगा तालुक्यातून बाहेती सिध्दी या विद्यार्थीनीने ९९.२५ परसेंटाईल घेऊन प्रथम
निलंगा – येथील महाराष्ट्र शिक्षण समिती संचालित महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन- २०२३ मध्ये झालेल्या जेईई परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. बाहेती सिद्धी, बिराजदार अक्षता, स्वामी कार्तिक, राठोड आविष्कार, भोसले राजश्री, यादगिरे गणेश, आग्रे रुद्र या विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरु विद्यार्थी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्रतिकुल परिस्थितीत देशपातळवरील जेईई सारख्या परीक्षेत यश संपादन करीत आहेत. या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे होते. यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, सीईटी सेलचे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर, सहाय्यक समन्वयक प्रा. अनुप पांचाळ, जेईई चे सहाय्यक समन्वयक प्रा. राकेश दवणे, नीटचे सहाय्यक समन्वयक प्रा. विजय देशमुख, प्रा. सुनील पाटील आदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, संस्था समन्वयक दिलीपराव धुमाळ आदीनी कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश दवणे यांनी केले. आभार प्रा. विजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. धनराज मंडले, प्रा. पंचाक्षरी पी. यु., प्रा. मुळे ए. आर., प्रा. हेरकर ए.यु., प्रा. कोकरे पल्लवी, शिंदे इस्माईल व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.