माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
रेणापूर व उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
नूतन संचालकांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी रेणापूर व उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सर्व संचालकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन
करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन सर्व संचालकांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशेल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, माजी
सभापती रमेश सूर्यवंशी, माजी सभापती कल्याण पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादीचे उदगीर तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे, रेणापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सर्वश्री प्रमोद कापसे, अशोक राठोड, मुरलीधर पडोळे, प्रकाश सूर्यवंशी, अमर वाकडे,
सुशीलकुमार पाटील, नागनाथ कराड, जयश्री जाधव, राजामती साळुंखे, उमाकांत खलंगरे, शेषेराव हाके, प्रवीण माने, शिरीष यादव, शिवाजी आचार्य, विश्वनाथ कागले,कमलाकरआकनगीरे, जनार्धन माने, उदगीर बाजार समितीचे नूतनसंचालक सर्वश्री शिवाजीराव हुडे, लक्ष्मीताई भोसले, प्रीती भोसले, जीवन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बालाजी देवकते, गौतम पिंपरे, प्रमोद पाटील, पद्माकर उगिले, श्याम डावळे, वसंत पाटील, संतोष बिराजदार, देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित बेळकुणे, बालाजी कारभारी, अनिल पाटील, किशोर बिराजदार, शेषराव पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
—–