लातूर आयएमएच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
अध्यक्षा डॉ. सौ. प्रिती बादाडे , सचिव डॉ. सौ. प्रियंका राठोड
लातूर : लातूर आयएमएच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी लातुरातील बार्शी रोडवरील ऑफिसर्स क्लब या ठिकाणी पार पडलेल्या शानदार सोहळ्यात पदभार स्वीकारला. महिला विंगच्या अध्यक्षा म्हणून डॉ. सौ. प्रिती सुधीर बादाडे यांनी, सचिव म्हणून डॉ.सौ. प्रियंका मेहुल राठोड यांनी तर कोषाध्यक्षा म्हणून डॉ. उमा लोंढे, डॉ. मोनिका पाटील यांनी पदभार स्वीकारला.
आयएमएच्या महिला विंगच्या या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर , आयएमएचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश भराटे , आयएमए लातूरचे नूतन अध्यक्ष डॉ. अनिल राठी,सचिव डॉ.आशिष चेपुरे महिला विंगच्या माजी अध्यक्षा डॉ. शुभांगी राऊत, सचिव डॉ. श्वेता काटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आयएमए महिला विंगची वर्ष २०२३ – २४ साठीची कार्यकारिणी यावेळी घोषित करण्यात आली . उपाध्यक्षा डॉ. ममता वोरा, सहसचिव डॉ. दिप्ती देशमुख, डॉ. प्रणिता नागुरे , सह कोषाध्यक्षा डॉ. दिशा ओव्हळ , डॉ. दीपा पुरी, राज्य प्रतिनिधी डॉ. वैशाली दाताळ , ज्येष्ठ सदस्या : डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. माया कुलकर्णी, डॉ.सरिता मंत्री, डॉ. वसुधा जाजू, डॉ.शोभराणी कर्पे , डॉ.अरुणा देवधर, डॉ. ज्योती पाटील, डॉ.सुचित्रा भालचंद्र.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरेखा कोसमकर यांनी आयएमएच्या महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांना कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून या उपक्रमासाठी त्या वेळ काढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनेकवेळेस महिला, शाळकरी मुलींवर अत्याचार होतात. त्यावेळी स्वतःहून तक्रार करण्यासाठी कोणी फारसे पुढे येताना दिसत नाही. अशावेळी महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी पिडितांना मदत करण्यासाठी हिरीरीने पुढे येणे आवश्यक आहे. त्याचा प्रशासनालाही चांगलाच उपयोग होऊ शकेल. महिलांच्या स्वास्थ्यासोबतच समाज स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठीही पदाधिकाऱ्यांनी योग्य ते उपक्रम राबवावेत,असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. रमेश भराटे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना महिला पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचे सांगितले. डॉ. अनिल राठी यांनी यावेळी बोलताना सर्वच आघाड्यावर नेत्रदीपक कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.
नूतन अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्वांना सोबत घेऊन आपण लातूर आयएमएच्या महिला विंगच्या कार्याचा आलेख सातत्याने चढता राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. महिलांच्या स्वास्थासोबत महिलांविषयक विविध समस्या, त्यांना येणाऱ्या अडीअडचणींविषयी आपण जागरूक राहून कार्य करण्यास कटिबद्ध आहोत. आयएमए महिला विंग ही एक संघटना नसून एक कुटुंब आहे, या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या भावनांचा आदर करून संघटनेचे कार्य अधिकाधिक चांगले होईल यासाठी आपण या प्रयत्नशील राहू असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम महिला विंगच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन सचिव डॉ. प्रियंका राठोड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. सर्वांना सोबत घेऊन आपण संघटनेचे कार्य सर्वोत्कृष्ट कसे राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण निश्चितपणे यशस्वीरीत्या सांभाळू असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रामेश्वरी अलाहाबादे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका राठोड यांनी केले.
यावेळी डॉ. शैला सोमाणी, डॉ. सुरेखा काळे, डॉ. मोहिनी गानू, डॉ. सुरेखा निलंगेकर, डॉ. संगीता देशपांडे, डॉ.संध्या वारद , डॉ.स्नेहल देशमुख, वृंदा कुलकर्णी, डॉ. सुनीता पाटील, डॉ. दिप्ती देशमुख, डॉ. सुजाता सारडा, डॉ. स्नेहल गंभीरे , डॉ. रामेश्वरी अलाहाबादे, डॉ.शिल्पा दडगे , डॉ.राजश्री सावंत, डॉ.शिल्पा गोजमगुंडे, डॉ. संजीवनी तांदळे, डॉ. आरती झंवर, डॉ. शीतल ठाकूर, डॉ. राजेश्वरी गुंडावार , डॉ. स्वप्ना निलंगेकर, डॉ. सुजाता पाटील,डॉ. सगिरा सिद्दीकी,डॉ. अर्चना पंडगे ,डॉ. सपना उटीकर , डॉ. अपूर्वा चेपुरे, डॉ. सविता काळगे , डॉ. कल्पना किनीकर आदींची उपस्थिती होती.