माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांचे
अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या नूतन सर्व संचालकांनी भेट घेतली, सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन सर्व संचालकांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी सभापती रमेश सूर्यवंशी, लातूर कृषी उत्पन्न
बाजार समितीचे संचालक सर्वश्री जगदीश जगजीवनराव बावणे, श्रीनिवास श्रीराम शेळके, लक्ष्मण रामकृष्ण पाटील, युवराज मोहनराव जाधव, आनंद रामराव पाटील, आनंद धोंडीराम पवार, तुकाराम ग्यानदेव गोडसे, सुरेखा बळवंत पाटील, लतिकासुभाष देशमुख, सुनिल नामदेवराव पडीले, सुभाष दशरथ घोडके, अनिल सुभाष पाटील, शिवाजी किसनराव देशमुख, बालाजी हरिश्चंद्र वाघमारे, सचिन विष्णु
सुर्यवंशी, बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा, सुधीर हरिश्चंद्र गोजमगुंडे, शिवाजी दौलतराव कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, टवेन्टिवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, बाजार समिती माजी उपसभापती
मनोज पाटील, गोविंद बोराडे, गणेश एसआर देशमुख, गिरीष ब्याळे, रमेश पाटील,राजकुमार पाटील, स्मिता खानापूरे, सपना किसवे, अनंत बारबोले आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते