निलंग्यात विमा कार्यालयाच्या समोर छावा संघटनेचा रास्तारोको
निलंगा ( प्रतिनिधी ) पंचनामे न करता सरसकट वीमा देण्यात यावा या मागणीसाठी निलंगा औराद शहाजानी रोडवर वीमा कंपणीच्या कार्यालयाच्या समोर छावा संघटनेच्या वतीने विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पिक पाण्यात गेल्याने शेतकरी बांधावर बसून हंबरडा फोडत आहेत. दुसर्या बाजूला वीमा कंपनी 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसान झाले म्हणून कळवा असे सांगत आहेत. अनेक शेतकर्यांकडे मोबाईल नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना चालवता येत नाहीत. सततच्या पावसाने विद्युत पुरवठा बंद झाल्याने नेटवर्क चालत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी कशाच्या माध्यमातून वीमा कंपणीला अर्ज देणार आहेत. पावसाची व नुकसानीची नोंद महसूल विभागात झाली आहे. परत पंचनाम्याची नाटके कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत निलंगा औराद शहाजानी रोडवर भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जवळपास एक तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारल्या नंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष भगवान माकणे, तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, तालुका कार्याध्यक्ष गुणवंत सिरसले, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव गोमसाळे, अदित्य धुमाळ, विकी पाटील, बबरु पवार, संजय पौळ, शाहरुख शेख, ओमप्रकाश पिंड, माधव जाधव, श्रीमंत पाटील, माधव भक्ते, शिवाजी पाटील, लक्ष्मण शिंदे, नामदेव शिंदे, विठ्ठल पवार, ओमप्रकाश सुर्यवंशी, शुभम धुमाळ, कृष्णा सुर्यवंशी अदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलंग्यात विमा कार्यालयाच्या समोर छावा संघटनेचा रास्तारोको
