शिवकुमार मोरे यांची राष्ट्रीय संशोधन फेलोशिप साठी निवड
निलंगा:शिवकुमार सुनील मोरे यांची छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था ,(सारथी) पुणे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संशोधन फेलोशिप साठी निवड झाली आहे. सदरील संस्थेकडून पीएचडी संशोधन करणाऱ्या पात्र उमेदवारास पुढील सुविधा दिल्या जातात.
शिवकुमार सुनिल मोरे यांचा परिचय
रा. ईनामवाडी ता.निलंगा जि.लातूर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईनामवाडी, ता.निलंगा येथे व
माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल विहामांडवा ता. पैठण जि. औरंगाबाद.महाविदयालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे, एम.ए.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पूर्ण केले.
बी.एड.कामधेनू बी.एड.महाविद्याल औरंगाबाद. सेट उत्तीर्ण
(विषय: अर्थशास्त्र ) सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ 2021 या वर्षी.
NSS ,(राष्ट्रीय सेवा योजना) राज्यस्तरीय व राष्ट्रीय शिबीरात सहभागी, तसेच 05 research papers published National and international conference, तसेच अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे संशोधन सुरू आहे. संशोधन विषय – मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात सामान्य विम्याचे योगदान विशेष संदर्भ औरंगाबाद व जालना जिल्हा
त्यासाठी संशोधना करीता छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी पुणे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संशोधन अधीछात्रवृत्ती (csmnrf) 2022 साठी निवड झाली आहे. या संशोधनासाठी सदरील संस्थेकडून पाच वर्षासाठी फिलोशीप दिली जाणार आहे. यामध्ये पहिल्या दोन वर्षासाठी 38500/- रू प्रत्येक महिन्याला व पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 43500/- रू फिलोशिप मिळणार आहे. तसेच तो सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहे.